मुख्यपृष्ठ

“महाराष्ट्र अधिकृत ऑडिटर्स असोसिएशन'', नागपूर, याची नोंदणी दिनांक १०/१०/१९८० ला झाली. या न्यासाची स्थापना दिनांक २३/०३/१९८० ला झाली होती. त्याचा नोंदणी क्रमांक  महा : २२३ / ८० / नागपूर, एफ : २७३८  नागपूर, हा आहे. त्यावेळेस न्यासाची कार्यकारणी पुढील प्रमाणे होती.

अ.
क्र.
पदाधिकाऱ्यांचे नाव शहर पद
1 श्री. रामचंद्र कृष्णाजी देशपांडे पुणे अध्यक्ष
2 श्री. शांतीलाल बन्सीलाल गांधी अहमदनगर उपाध्यक्ष
3 श्री. वसंतराव रेणुकादास राजवैद्य नागपुर सचिव
4 श्री. विजय सव्वाराम तांबे डोंबीवली सहसचिव
5 श्री. व्दारकादास गोपालदास बंजारा मुंबई  सदस्य
6 श्री. श्रीहरी रामचंद्र रायरीकर पुणे सदस्य
7 श्री. केशवशंकर कुलकर्णी पुणे सदस्य
8 श्री. शरद अवधुत कुलकर्णी अहमदनगर सदस्य
9 डॉ माधुरी वसंतराव राजवैद्य नागपुर सदस्य

या नऊ जणांनी मिळून '।महाराष्ट्र अधिकूत ऑडिटर असोसिएशन'', नागपूर, संस्थेची स्थापना केली. त्यावेळेस अधिकृत लेखापरिक्षकांची ऑडिट करण्याची मर्यादा रू. ५०००/- (पाच हजार) होती. त्यानंतर ही मर्यादा रू. ५०००/- (पाच हजार) वरून रू. १०,०००/- (दहा हजार) वर झाली, त्यानंतर रू. १०,०००/- (दहा हजार) वरून रू. १५,०००/- (पंधरा हजार) वर झाली. त्यानंतर रू. १५,०००/- (पंधरा हजार) वरून दिनांक शनिवार २९/११/१९९७ ला रू. ५०,०००/- (पन्नास हजार) वर झाली. मग ही मर्यादा रू. ५०,०००/- (पन्नास हजार) वरून रू. १,०००००/- (एक लाख) पर्यंत झाली. इथपर्यन्त स्व. वसंतराव रेणुकादास राजवैद्य, नागपुर, संस्थेचे सचिव, यांनी दिनांक २४/०३/१९९७ पर्यन्त कार्यभार सांभाळला. या पुढे ही धुरा श्री. श्रीकांत वामनराव गुप्ते, पुणे यांनी सन २०१२ पर्यन्त म्हणजेच १५ वर्ष कार्यभार पाहिला. दिनांक ०९/०१/२००९ ला अधिकूत लेखापरिक्षकांचे सार्वजनिक न्यासाचे लेखापरिक्षण करण्यासाठी सार्वजनिक न्यासाच्या उत्पन्नाची मर्यादा एक लाख वरून ही मर्यादा रद्‌दबादल करण्यात आली व अधिकृत लेखापरिक्षकांना उत्पन्नाची मर्यादा राहिली नाही, त्यानंतर कितीही उत्पन्न असलेल्या संस्थेचे लेखापरिक्षण अधिकृत लेखापरिक्षक करू शकत होते. सन २०१२ पासून न्यासाचे सचिव श्री. प्रसाद वसंतराव राजवैद्य यांनी कार्यभार हाती घेतला. त्यानंतर आदेश क्रमांक ३९७ नुसार दिनांक १४/०९/२०१२ रोजी अधिकृत लेखापरिक्षकांना दिलेले कायमस्वरूपी आदेश संपुष्टात आले. त्यानंतर मा. धर्मादाय आयुक्‍त, महाराष्ट्र राज्य, मुंबई., यांच्या आदेशांवर मा. मुंबई उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ नागपुर., येथील रिट पीटेशन क्रमांक ६३५०/१२ वर “जैसे थे'' असे आदेश झाले. ३६८/१६ चे आदेश दिनांक ०६/०४/२०१६ रोजी र्निगमीत करण्यात आले. त्यानंतर लेखापरिक्षकांची नियुक्‍ती थाबली, त्यानंतर परत मा. उच्च न्यायालय, नी असे आदेश दिले की, नव्याने फेर नियुक्‍ती करण्यात यावी. त्यानंतर रू ५००/- भरून ३ वर्षे साठी अधिकृत लेखापरिक्षकांची फेर नियुक्‍ती सुरू झाली.

महाराष्ट्र अधिकूत ऑडिटर असोसिएशन, नागपूर., यांनी नागपूर येथे दिनांक १९/०३/२०१६ रोजी अधिवेशन मध्ये मा. धर्मादाय आयुक्तांना निवेदन दिले की, अधिकृत लेखापरिक्षकांची दोन जिल्हयांची मर्यादा न ठेवता संपुर्ण महाराष्ट्र करण्यात यावी आणि नुतनीकरणांचा कालावधी तीन वर्षा ऐवजी पाच वर्ष करण्यात यावा हे दिनांक ०६/०४/२०१६ रोजी आदेश क्रमांक ३७८/१६ नुसार मंजुर झाला, तसेच आदेश क्रमांक ४४३/१६ नुसार दिनांक १२/०६/२०१७ रोजी मा. धर्मादाय आयुक्‍त श्री. श. भा. सावळे साहेब, महाराष्ट्र राज्य. मुंबई., यांच्या आदेशानुसार जिल्हयांची मर्यादा काढून संपुर्ण महाराष्ट्र करण्यात आली. याप्रमाणे महाराष्ट्र अधिकृत ऑडिटर असोसिएशन, नागपूर., चे कार्य आणि परिश्रम सुरू आहे. सध्याची कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे.

अ.
क्र.
पदाधिकाऱ्यांचे नाव शहर पद
1  प्रभाकर सारजाराम पवार अहमदनगर अध्यक्ष
2 चंद्रकांत गदगेप्पा ममदापूरे लातूर  उपाध्यक्ष
3  प्रसाद वंसतराव राजवैद्य नागपुर  सचिव
4 मुकेश हेमराज बोंबाटे नागपुर सहसचिव
5 अकबर अली शहापूरवाला मुंबई  सदस्य
6 आमिन युसुफ बागवान सातारा सदस्य
7 शिवाजी मारुती परीट कोल्हापूर सदस्य
8 डी. बी. खान बीड सदस्य
9 प्रविण प्रभाकर राजवैद्य नागपुर सदस्य